Rape News: मध्यरात्री घरात एकटी पाहून महिलेवर बलात्कार
Rape News: २६ वर्षीय महिलेवर मध्यरात्री दोन वाजता घरात घुसून एका तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना, सातार्यात घडली घटना.
सातारा: एका २६ वर्षीय महिलेवर मध्यरात्री दोन वाजता घरात घुसून एका तरूणाने बलात्कार (Rape)केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित संशयित तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला २६ वर्षांची आहे. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी ती महिला रात्री घरात एकटी झोपली होती. त्यावेळी रात्री दोनच्या सुमारास एका तरूणाने तिच्या घराचा दरवाजा वाजविला. पीडित महिलेने दरवाजा उघडताच तिला आतमध्ये ढकलून दिले. त्यानंतर त्याने आतून दार लावून पीडित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. भीतीमुळे त्या महिलेने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. मंगळवारी रात्री संबंधित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्या तरूणाच्या विरोधात तक्रार दिली. आरोपी तरूणाला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
Web Title: A woman was rape after seeing her alone at home in the middle of the night
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App