धक्कादायक! विधवा महिलेवर चालत्या जीपमध्ये केला बलात्कार अन्…
Beed Crime: विधवा महिलेवर चालत्या जीपमध्ये बलात्कार (raped) केल्याची घटना, महिलेच्या प्रियकरासमोर दोघांनी तिच्यावर अत्याचार.
बीड: जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विधवा महिलेवर चालत्या जीपमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आली आहे. संतापजनक म्हणजे या महिलेच्या प्रियकरासमोर दोघांनी तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत महिलेच्या प्रियकरासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला. अत्याचार केल्यावर या महिलेला एका गावात नेऊन दुसऱ्या एका महिलेने पाईप आणि चप्पलने मारहाणही केल्याचा आरोपही पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. मागील एक वर्षापासून सदर महिलेचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध आहे. दोघेही बीड येथेच सोबत राहतात. दरम्यान, शुक्रवारी (ता. चार) सदर महिला बार्शी रोड येथून जात असताना त्याठिकाणी जिपमधून उतरलेल्या तिच्या प्रियकराने तिला गाडीत मधल्या सीटवर बसविले.
जीप बार्शी नाक्याच्या दिशेने निघाली. त्याच वेळी गाडीत बसलेल्या प्रियकराच्या भावाने व अन्य एका व्यक्तीने चालत्या गाडीतच महिलेचे केस धरून तिचे डोके गाडीच्या दारावर आदळले. यानंतर तिच्यावर दोघांनी जबरदस्तीने अत्याचार (abused) केल्याचे पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनतर गाडी तशीच सात्रा पोत्रा परिसरात नेली. तिथेही प्रियकराच्या घरातील काही जणांनी पीडित महिलेला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सुरेश लंबाटे याच्यासह अमोल लंबाटे, बापूराव हावळे व एक महिला अशा चौघांविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: A widow was raped in a moving jeep
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App