Breaking News | Solapur Crime: एका गावातील अल्पवयीन १६ वर्षीय मुलीस व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सोलापूर येथे लॉजवर नेऊन अत्याचार.
तुळजापूर : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन १६ वर्षीय मुलीस व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सोलापूर येथे लॉजवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी गावातील एका तरुणाविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना २९ सप्टेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान घडली आहे.
स्त्रीशक्ती देवतेच्या तुळजाई नगरी परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. दोन महिन्यापूर्वी एका डॉक्टरने रुग्ण तरुणीस गुंगीचे औषध देऊन अत्याचार करत व्हिडिओ बनवल्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याच तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सोलापूर येथे तरुणाविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा लॉजवर नेऊन अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने गावातीलच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिला सोलापूर येथील लॉजवर नेले. तेथे तिथे तिच्यावर अत्याचार करत व त्याचा व्हिडिओ बनवत माझ्याशी लग्न करत नाही तर तुझे व्हिडिओ व्हायरल करेन, तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. हा प्रकार दि.२९ सप्टेंबर ते दि.९ डिसेंबर दरम्यान अनेकदा घडला असून अखेर याप्रकरणी पिडितेने गुरूवार दि.१२ डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीवर पोक्सोसह अॅट्रॉसिटी व इतर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी फरार असल्याचे कळते.
Web Title: A minor girl was abused at the lodge
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study