अहमदनगर: 32 वर्षीय महिलेवर पेरूच्या बागेत अत्याचार
Ahmednagar News: पेरूच्या बागेत मुलाचा शोध घेण्यास गेलेल्या 32 वर्षीय महिलेवर एका तरुणाने रविवारी दुपारी अत्याचार (Rape) केल्याची घटना.
राहाता | Rahata: पेरूच्या बागेत मुलाचा शोध घेण्यास गेलेल्या 32 वर्षीय महिलेवर एका तरुणाने रविवारी दुपारी अत्याचार केल्याची घटना साकुरी शिवारात घडली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध राहाता पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
कुणाल विजय शिंदे, रा. गोदावरी वसाहत असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, मुलगा साहिल रविवारी दुपारी गोदावरी वसाहत येथील त्यांच्या मित्राबरोबर खेळण्यासाठी गेला होता. तो बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने आई व मी रविवारी दुपारी त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडलो. आई बनसोडे मळ्याकडे त्याला शोधण्यासाठी गेली व मी साकुरी शिवारातील दंडवते यांच्या पेरूच्या बागेकडे जात असताना माझ्या ओळखीचा कुणाल विजय शिंदे हा दंडवते यांच्या पेरूच्या बागेजवळ भेटला व तो मला म्हणाला ताई इकडे काय करता.
तो माझ्या ओळखीचा असल्यामुळे मी त्याला म्हणाले मुलगा साहिल घरी आला नाही. त्याला शोधत आहे. त्यावर तो साहिल याला शोधण्यासाठी मदत करतो म्हणाला. मी दंडवते यांच्या पेरूच्या बागेत जात असताना कुणाल शिंदे माझ्या पाठीमागून आला व त्याने मला मिठी मारून दोन्ही हाताने माझे तोंड दाबून दंडवते यांच्या बागेत घेऊन गेला व माझ्या इच्छे विरुद्ध बळजबरीने माझ्याशी संभोग केला. त्यावेळी तो संभोग करीत असताना मी त्याच्याशी झटापट केली असता त्याने माझ्या गळ्याला हाताच्या नखांनी जखमी केले. मी ओरडण्याचा प्रयत्न केला परंतु पेरूच्या बागेत कोणी नसल्यामुळे माझ्या मदतीला कोणीही आले नाही. त्याने माझ्याशी बळजबरीने संभोग केल्यानंतर तो मला म्हणाला मी तुझ्याबरोबर संभोग केला हे जर तु कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या मुलाला गळा कापून ठार मारीन.
हा प्रकार मी घरी आल्यानंतर बहिणीला सांगितला. त्यानंतर आई, मुलगा साहिल याला शोधून घरी आली. तिलाही घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आई व बहीण दोघीही मला तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन आल्या. पीडितेच्या फिर्यादीवरून कुणाल शिंदे यांच्याविरुद्ध भा.दं.वि कलम 376, 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा करून आरोपी पसार झाला आहे. आरोपीचा शोध पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे घेत आहेत.
Web Title: A 32-year-old woman was Rape in a guava orchard
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App