Home संगमनेर संगमनेर: विहिरीत बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

संगमनेर: विहिरीत बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

Sangamner News: विहिरीच्या पाण्यात बुडून (drowning) १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना.

  A 14-year-old boy died after drowning in a well

संगमनेर:  विहिरीच्या पाण्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १३) दुपारी एक वाजेच्या सुमारास तालुक्यातील रहिमपूर गावात घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समर्थ पांडुरंग शिंदे (रा. रहिमपूर, ता. संगमनेर) असे मयत मुलाचे नाव आहे. तो विहिरीत पडल्याचे समजल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत तो औषधोपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. संबंधित रुग्णालयाचे डॉक्टरांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विष्णू आहेर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A 14-year-old boy died after drowning in a well

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here