Home राहुरी चित्तथरारक: गायींवर बिबट्याचा हल्ला, या हल्यात दोन व्यक्ती जखमी

चित्तथरारक: गायींवर बिबट्याचा हल्ला, या हल्यात दोन व्यक्ती जखमी

Rahuri Bibatya attack on cows two people injured in the attack

राहुरी  | Rahuri: राहुरी तालुक्यातील चिखलठाण गावातील बुळे पठार येथे बिबट्याने गायींवर हल्ला केला त्याच्या बचावासाठी आलेल्या दोन व्यक्तींना जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

या बिबट्याच्या हल्यात मच्छिंद्र दुधावडे, तावजी केदार हे दोघे जण जखमी झाले आहेत. घरासमोर बाधित असलेल्या पाळीव गायींवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामुळे गायींनी हंबरडा फोडला. या गायींचा व महिलांचा आवाज आल्याने शाळेजवळ शेकोटी घेत असलेले मच्छिंद्र दुधावडे हे घराकडे आले. त्यांनी मोबाईलच्या उजेडात पहिले असता गायींवर बिबट्याने हल्ला करीत असल्याचे पाहिले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावले.

मात्र या दरम्यान घरातून बत्ती आणून उजेडात बिबट्या कोठे दिसतो आहे का हे पाहत असताना बिबट्याने मागे फिरून दुधावडे यांच्यावर हल्ला केला. हाती हात पुढे करत छातीवर होणारा हल्ला हातावर घेतला. त्याच्या हाताला बिबट्याने चावा घेत हात पकडून ठेवला. त्या परिस्थिती मध्ये एका हाताने दाबत जबड्यातील हाताची सुटका करून घेतली. संधी साधून जीव वाचवून घरात निघून गेले. त्याचवेळी जवळ राहणारे तावजी केदार मदतीसाठी आले असता त्यांच्यावर हल्ला केला, त्यांच्या पोटालाही जखमा केल्या. या हल्यातील जखमींवर डॉ. जालिंदर घिगे यांनी प्राथमिक उपचार केले. सकाळी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.

Web Title: Rahuri Bibatya attack on cows two people injured in the attack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here