संगमनेर: तरुणावर हल्ला करणारी बिबट्याची मादी अखेर जेरबंद
संगमनेर | Sangamner: गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बिबट्याने तरुणावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनिल संभाजी मधे हा युवक जखमी झाला होता.
ही घटना संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे घडली होती. तरुणावर हल्ला केल्याने वन खात्याने पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटे ही बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे.
आंबी दुमाला येथे सावकार शिंदे यांच्या शेतीत वाट्याने करण्यात आलेल्या कांद्याच्या रोपाला अनिल मधे पाणी भरत होते. याठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणावर अचानक हल्ला करत खाली पाडले. या हल्ल्यात अनिल मधे जखमी झाल्याने बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात पिंजऱ्यात जेरबंद झाला. पिंजर्यातून धडपड केल्याने पिंजऱ्याचे गज वाकविले त्यामुळे बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने दुसरा पिंजरा लावत बिबट्याची ,मादी जेरबंद करण्यात आली. आणि त्याची रवानगी चंदनापुरी येथील निसर्ग परिचय केंद्रात रवानगी करण्यात आली.
Web Title: Sangamner female leopard that attacked the young man
कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436