अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लग्न करण्यास चाकूचा धाक दाखवून धमकी
राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यात देवळाली प्रवरा येथील एका मुलीस पळवून नेऊन तिला चाकू दाखवून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी समजलेली माहिती अशी की, देवळाला प्रवरा येथील ११ इयत्तेत शिकणारी अल्पवयीन मुलगी २४ ऑक्टोबरला देवळाली प्रवरा येथे आठवडे बाजारात भाजीपाला आणण्यासाठी गेली होती. रस्त्यात आरोपी अनिता पारखे ह्या मुलीस भेटली. पाच मिनिटांसाठी घरी चल असे म्हणाली. मुलीने नकार दिला तरी बळजबरीने अनिता पारखे हिने तिला घरी नेले. थोडा वेळानंतर सदर मुलगी तेथून निघाली. रस्त्यात आरोपी विकास पारखे मुलीस म्हणाला तू गाडीवर बस तुला बाजारात सोडतो असे म्हणून सतीश गायकवाड या मित्राच्या घरी सदर मुलीस घेऊन गेला.
आरोपी विकासने तिला बळजबरीने गाडीवर बसवून नगरच्या दिशेने घेऊन गेला. तुला माझ्या सोबत लग्न करायचे आहे. तू काही बोलू नकोस त्याच्या जवळील चाकू दाखवत त्याने दम दिला. नगर येथे झोपडी कॅन्टीन येथे गेला असता चाकूचा धाक दाखवून तू कोठे काही बोललीस तर जीवे मारीन अशी धमकी दिली. आणि तो तिला तिथेच सोडून निघून गेला. नंतर पिडीत मुलीला घरच्या लोकांचा फोन आला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावरून अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात विकास सुनील पारखे, अनिता सुनील पारखे, व आकाश सुनील पारखे या तिघांविरोधात अपहरण व विनयभंग असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Rahuri girl kidnapped crime registered