आदिवासी भागासाठी चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना विशेष बाब म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावा – माजी.आ.पिचड
अकोले प्रतिनिधी: अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत आदर्श शिक्षक म्हणून ५ सप्टेंबरला पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारामध्ये आदिवासी भागात राहून चांगल्या प्रकारचे काम करणाऱ्या शिक्षकांना यापूर्वी विशेष बाब म्हणून पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली.
जि.प.अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भात श्री.पिचड यांनी पत्र देऊन मागणी केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, दि.5 सप्टेंबर रोजी दिल्या जाणाऱ्या आदर्श पुरस्कारांमध्ये आपल्या स्तरावरुन आदिवासी भागात राहून उल्लेखनिय असे चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना विशेष बाब म्हणून पुरस्कार दिल्यास शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल व आदिवासी भागातील शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना यामुळे चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन मिळेल. यासर्व बाबींचा विचार करता जिल्ह्यातून आदिवासी भागासाठी विशेष बाब म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रथम प्राधान्याने देण्यासाठी आपल्या स्तरावरुन उचित कार्यवाही करुन विशेष बाब म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली.
Web Title: Teacher Day Award as a special case