राम मंदिर भूमिपूजन सोहळयाचे निमंत्रण आले तरी जाणार नाही: शरद पवार

मुंबई: अयोध्येतील राममंदिर सोहळ्याची तयारी अंतिम तयारीत असून निमंत्रणाची यादीही तयार केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केल आहे की, भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण आले तरी मी अयोध्येला जाणार नाही अस त्यांनी स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रसरकारने अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन मुहूर्त निश्चित केला होता. देशात सध्या करोनाचे संकट असताना या निर्णयाबाबत यांनी आश्चर्य व्यक्त केल होत. राम मंदिर बांधल्याने करोना जाईल असे काही लोकांना वाटत असेल असा टोला देखील त्यानी लगाविला होता. यावरून राजकीय वादंगदेखील रंगले होते. भाजप नेत्यांनी शरद पवारांवर जोरदार टीकादेखील केली होती.
निमंत्रित यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सिएनएन न्यूज १८ या वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राम मंदिराबाबत आता कोणतेही वाद नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्व वाद मिटले आहेत. मात्र देशात सगळीकडे करोनाची गंभीर स्थिती असताना अशा परिस्थित राज्यात राहणे योग्य आहे म्हणून मी भूमीपूजनासाठी निमंत्रण मिळाले तरी जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sharad Pawar ram mandir decision

















































