Coronavirus: पाथर्डी शहरात करोनाचा पहिला मृत्यू
Coronavirus/पाथर्डी: पाथर्डी तालुक्यात करोनाचा पहिला मृत्यू झाला आहे. अहमदनगर येथे उपचार घेत असलेल्या पाथर्डी शहरातील ६७ वर्षीय करोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली.
या महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिची करोना तपासणी करण्यात आली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ती अहमदनगर येथे उपचार घेत होती. काल सोमवारी २७ जुलैला तिचा अंत झाला.
यामुळे पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर महिला ही एक पोलीस कर्मचारी यांची ती आई होती. या महिलेच्या घरातील संपर्कातील व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Pathardi taluka corona death