संगमनेर तालुक्यात ढोलेवाडी व कनोली येथे करोनाबाधित एकूण २०६
Sangamner/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज आणखी सात रुग्ण आढळून आहेत. आज शुक्रवार दिवसभरात १२ करोनाबाधित मिळून आले आहे.
आज शुक्रवारी सायंकाळी सात अहवाल प्राप्त झाले त्यात कनोली येथील चार तर ढोलेवाडी येथील तीन रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत.
कनोली येथे २५ वर्षीय तरुणी, ६४ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला आणि ३२ वर्षीय युवकाला करोनाची बाधा झाली आहे.
ढोलेवाडी येथे १८ वर्षीय तरुण, ३५ वर्षीय पुरुष तर ८ वर्षीय बालकाला करोनाची लागण झाली आहे.
संगमनेर तालुक्यात आज दोनशे पार झाले असून एकूण करोनाबाधितांची संख्या २०६ वर पोहोचली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner taluka Dholewadi and Kanoli corona patient