‘PSI ने 4 वेळा बलात्कार करुन…’, हातावर सुसाईड नोट लिहून महिला डॉक्टरची आत्महत्या
Satara Woman Doctor Suicide: उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या.

सातारा: साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. डॉ. संपदा मुंडे असं या महिला डॉक्टरचं नाव असून फलटण येथील एका हॉटेलच्या रूममध्ये तिने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. आत्महत्या कऱण्याआधी तिने हातावर सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये तिने पोलीस निरीक्षकाने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख केला आहे. तसंच एकाने आपला मानसिक छळ केल्याचं सांगितलं आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र हादरला आहे.
संपदा मुंडे नावाच्या डॉक्टर आणि जिल्हा पोलिसांमध्ये वैद्यकीय तपासणीवरून सुरू असलेल्या वादातून हे घडल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन्ही पक्षांमध्ये यापूर्वी वाद झाला होता, त्यानंतर डॉक्टरविरुद्ध विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
डॉ. मुंडे यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून आपल्याला अन्यायपूर्ण वागणूक दिली जात आहे आणि जर कथित गैरवर्तन थांबले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, असं सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी याप्रकरण चौकशी सुरु असल्याचं सांगितलं आहे.
“माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने आहे, ज्याने माझ्यावर 4 महिने बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागील 4 महिने शारिरीक आणि मानसिक छळ केला,” असं तिने हातावरील सुसाईट नोटमध्ये लिहिलं आहे.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी या घटनेवर बोलताना सांगितलं की, “मी यासंदर्भात पोलिस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षकांसोबत सविस्तर बोललो आहे. ज्यांना लवकर शक्य आहे त्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्यास सांगितलं आहे. तसंच महिला एसडीपीओ तिथे पाठवली आहे. काही पोलिसांची नावं समोर येत असल्याने वरिष्ठ अधिकारी तिथे जातील आणि पुरावे ताब्यात घेतली. पुराव्य़ांशी छेडछाड होता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत पोलीस किंवा इतर कोणी असो, कोणालाही सोडलं जाणार नाही. गुन्हा तर दाखल केला आहे. मी पोलीस अधिक्षकांना आरोपींना ताब्यात घेण्याचे आणि कारवाई कऱण्याचे आदेश दिले आहेत”.
Breaking News: PSI raped me 4 times…’, female doctor commits suicide by writing a suicide note on her hand

















































