Home महाराष्ट्र लॉजवर पोलिसांचा छापा, वर्षेभरापासून महिलांना आणून देहविक्री व्यवसाय

लॉजवर पोलिसांचा छापा, वर्षेभरापासून महिलांना आणून देहविक्री व्यवसाय

Breaking News | Ratnagiri Crime: महिलांना देहविक्री आणून व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Lawwar police raid, women have been facing prostitution business 

रत्नागिरी : रत्नागिरी येथे महिलांना देहविक्री आणून व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीत “अनैतिक व्यापार” चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्वरित कारवाई करण्याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करून मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

चार महिलांना देहविक्रीच्या व्यवसायासाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे. 13 मे रोजी मंगळवारी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांची “अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956” कायद्या अंतर्गत संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. ही माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी एक संयुक्त पथक तयार केले. या पथका मार्फत लागलीच एक डमी गिराइक पाठवून खेडशी आकाशवाणी केंद्राचे समोर हॉटेल गौरव लॉज येथे छापा टाकण्यात आला. या ठिकाणी देह विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी 4 महिला आणलेल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी आरोपी अरमान करीम खान रा. कोकणनगर रत्नागिरी यास दोन पंचां समक्ष “अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956” कायद्या अंतर्गत ताब्यात घेऊन घटना स्थळा वरून तसेच आरोपीच्या ताब्यातून मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल तसेच ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हे पुढील कारवाई करिता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहेत तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत. वर्षभरापूर्वी रत्नागिरीमध्ये अशा स्वरूपाचा अनैतिक व्यवसाय उघड झाला होता. आता पुन्हा एकदा रत्नागिरीमध्ये महिलांना देह विक्रीसाठी आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Breaking News: Lawwar police raid, women have been facing prostitution business 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here