धक्कादायक! प्रेमप्रकरणातून तरुणीचा अंत, प्रियकराचे प्रेयसीवर कोयत्याने वार, स्वतः केली आत्महत्या
Raigad Crime News: प्रेम प्रकरणातून तरुणाने प्रेयसीची हत्या करुन स्वतःच आत्महत्या केल्याचे समोर आले.
रायगड: रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून तरुणाने प्रेयसीची हत्या करुन स्वतःच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुधागड तालुक्यातील परळी येथे मंगळवारी घडली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मंगळवारी (ता. 13) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या पूर्वी सुधागड तालुक्यातील परळी येथील डॉ. कल्पेश ओसवाल यांचे राजेश पॉलीक्लिनिक अँड नर्सिंग होम दवाखाना येथे ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण पाली तालुका हादरला आहे.
पौर्णिमा देसाई असे मयत तरुणीचे नाव असून शेखर दुधाणे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र पौर्णिमा आपला प्रियकर शेखर याला अलीकडच्या काही दिवसांपासून टाळत होती.
प्रेयसी टाळत असल्याच्या रागातून शेखर संतोष दुधाणे (वय 26) रा. दुधाणेवाडी, ता. सुधागड याने परळी येथील राजेश पॉलीक्लिनिक अँड नर्सिंग होम येथे जावून नर्स म्हणून काम करणाऱ्या पोर्णिमा अनंता देसाई हिच्या मनगटावर व गळ्यावर कोयत्याचे वार करून हत्या केली.
त्यानंतर येथील रूम मधील बेडशीटने पंख्याला गळफास घेऊन स्वतःला संपवले आहे. ही घटना समजताच जांभूळपाडा, पाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी दवाखान्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान पौर्णिमा हिचा भाऊ अनिकेत देसाई याने दिलेल्या तक्रारीवरून पाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: end of love life lover Himself Suicide