Home अहिल्यानगर अकोले सेवा संस्थेत चार लाखांचा अपहार

अकोले सेवा संस्थेत चार लाखांचा अपहार

Breaking News | Ahilyanagar Crime: ३ लाख ९० हजार ८७९ रुपये. ३१ पैशांचा अपहार केल्याची फिर्याद.

Four lakhs embezzled from Akole Seva Sanstha

पाथर्डी : तालुक्यातील अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव सुरेश दत्तात्रय देशमुख यांनी ३ लाख ९० हजार ८७९ रुपये. ३१ पैशांचा अपहार केल्याची फिर्याद वैधानिक लेखापरीक्षक जगदीश पातकळ यांनी पाथर्डी पोलिसांत दाखल केली आहे.

सोसायटीच्या लेखापरीक्षणात विविध आर्थिक व्यवहारांत अनियमितता आढळली असून, नकली खाते तयार करून कर्ज वाटप, अनामत व बँक व्यवहारात गैरव्यवहार, तसेच संस्थेच्या खात्यातील रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे असे प्रकार उघडकीस आले आहेत. संस्थेचे संचालक मंडळ व सभासदांची फसवणूक करून देशमुख यांनी

विविध मार्गांनी संस्थेची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी सहकार खात्याकडून फौजदारी कारवाईची परवानगी मिळाल्यानंतर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, सहकारी संस्थेतील आर्थिक गैरव्यवहारांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे. यापूर्वी सचिव सुरेश देशमुख यांच्यावर ८ एप्रिलला मोहज देवढे सेवा सोसायटीमध्ये १४ लाख दहा हजारांचा अपार केल्याचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. देशमुख याच्यावर वेगवेगळे दोन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणात १८ लाखांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

Web Title: Four lakhs embezzled from Akole Seva Sanstha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here