शिर्डीला जाताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर अपघात, दोन ठार
Breaking News | Accident: समृद्धी महामार्गावर अपघात होऊन दोन प्रवासी ठार झाले.
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यामधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघात होऊन दोन प्रवासी ठार झाले असून १० प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई कॉरिडॉरवर चॅनेल नंबर ३४४.७ वर आज (ता. ८) सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अपघात झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आसेगांव देवी (ता. बाभूळगांव जि. यवतमाळ) येथील १२ नागरिक शिर्डीला साई बाबाच्या दर्शनासाठी कुझर (Cruiser) क्रमांक एम. एच २५ आर ३५७९ ने जात असताना कुझर गाडीचे समृध्दी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर चॅनेल नंबर ३४४.७ वर अचानक टायर फुटले, त्यामुळे कुझर वाहन पलटी झाल्याने गाडीमध्ये प्रवास करणारे २ प्रवाशांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
तर, १० प्रवासी जखमी झाले. कुझरमधील विद्याबाई साबळे वय ४० वर्ष रा. आसेगांव देवी ता. बाभूळगांव व मोतीराम बोरकर वय ६० वर्ष रा. आसेगांव देवी ता. बाभूळगांव यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला आहे. तर, १० प्रवासी जखमी झाले आहेत. कुझर गाडीमध्ये १२ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जखमी प्रवाशांना समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे जालना येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. समृध्दी महामार्गावर मागून येणारी Toyota Creta क्रमांक २९ सी.बी.९६३० यवतमाळ वरून पुण्याला जात असताना चालकाकडून अपघातग्रस्त कुझर वाहनाला पाठीमागून धडकन Toyota Creta वाहनाचे नुकसान झाले आहे.
Web Title: Time flies while going to Shirdi, accident on Samruddhi Highway, two killed