अहिल्यानगर: विजेच्या धक्क्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Breaking News Ahilyanagar: एका महाविद्यालयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना.
राहुरी: राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे विजेचा धक्का लागून एका महाविद्यालयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ५ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
तालुक्यातील तांभेरे येथे ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कुणाल अशोक कांबळे (वय १८) हा महाविद्यालयीन तरुण त्याच्या घराजवळ पाणी भरत होता. त्यावेळी विजेचे शॉकसर्किट होऊन विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने कुणाल कांबळे याला जबरदस्त विजेचा धक्का बसला. त्याचवेळी भारती सनी कांबळे या महिलेला देखील विजेचा धक्का बसला. दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, कुणाल कांबळे या तरुणाचा मृत्यू झाला. तर भारती कांबळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे तांभरे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
Web Title: College student dies due to electric shock