संतभूमीत गोळीबाराचा थरार, वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार
Breaking News | Pune Crime: जुन्या वादातून एकाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना.
पुणे: जुन्या वादातून एकाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ मधील देहूरोडच्या गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे. देहूरोड येथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सराईत गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आला आहे.
या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला देहूरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर नंदकिशोर यादव याच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. गोळीबार केलेल्या आरोपींचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत. या घटनेने परिसर भयभीत झाला आहे. पुण्यात सातत्याने गोळीबाराच्या घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
Web Title: Thrill of firing in Sant Bhoomi, firing of criminals one death