Home अहिल्यानगर अहिल्यानगर: कॉपी का करू दिली नाही  शिक्षकांना जिवे मारण्याची धमकी

अहिल्यानगर: कॉपी का करू दिली नाही  शिक्षकांना जिवे मारण्याची धमकी

Breaking News  Ahilyanagar Crime: दोन पर्यवेक्षकांना पेपर सुटल्यानंतर ‘माझ्या बहिणीला कॉपी का करू दिली नाही’ अशी विचारणा करत अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी.

Why was not allowed to copy Teachers were threatened with death

पाथर्डी : बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालय केंद्रावरील दोन पर्यवेक्षकांना पेपर सुटल्यानंतर ‘माझ्या बहिणीला कॉपी का करू दिली नाही’ अशी विचारणा करत अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच याच केंद्रावरचे केंद्र संचालक है उत्तरपत्रिका घेऊन पाथर्डीकडे येत असताना त्यांचे वाहन अडवून त्यांना शिवीगाळ करण्यात आली.

या घटनेमुळे शिक्षक भयभीत झाले असून, परीक्षाकाळात शिक्षकांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी बारावीचा इंग्रजीचा पेपर होता. राज्य शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार केंद्र बदलून पर्यवेक्षक नेमले असल्याने तिसगाव येथील केंद्रावर पाथर्डी येथील शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. त्यानुसार पाथर्डी येथील २५ शिक्षक सकाळीच तिसगाव येथील केंद्रावर दाखल झाले. परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रा. सचिन ढाकणे हे ज्या वर्गावर पर्यवेक्षक होते त्या वर्गाच्या खिडकीतून त्यांना अज्ञाताकडून दमदाटी करण्यात आली. तसेच पेपर सुटल्यानंतर दुसरे पर्यवेक्षक सुनील शेटे यांनाही दमदाटी करण्यात आली. पेपर सुटल्यानंतर केंद्र संचालक हेमंत नांगरे हे पेपर घेऊन वाहनाने पाथर्डीकडे येत होते,

त्यांच्याबरोबर पाथर्डीतील सर्व पर्यवेक्षक आपापल्या वाहनातून पाथर्डीकडे येत असताना तिसगावमधेच त्यांना अडवून अज्ञात इसम शिवीगाळ करू लागला, माझ्या बहिणीला कॉपी का करून दिली नाही, मी तुम्हाला पाथर्डीत येऊन जिवे मारेल, अशी धमकी त्याने दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी हस्तक्षेप करत शिवीगाळ करणान्यास बाजूला केले. यावेळी उपस्थित काही लोक शिवीगाळ करणाऱ्यास ए. के. नावाने हाक मारत होते, असे सदर शिक्षकाने सांगितले. याप्रकरणी शासकीय काम करीत असताना अटकाव केला म्हणून अज्ञाताविरुद्ध केंद्र संचालक हेमंत नांगरे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: Why was not allowed to copy Teachers were threatened with death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here