अहिल्यानगर: वेश्या व्यवसायावर छापा, तीन महिलांची सुटका
Breaking News | Ahilyanagar Prostitution: वेश्या व्यवसायावर छापा टाकत ३ महिलांची पोलिसांनी सुटका करुन मुद्देमाल ही जप्त केला.
अहिल्यानगर : नगर-पाथर्डी रोडवरील तिसगाव शिवारातील मित्रधन हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकत तीन महिलांची सुटका केली असून, आरोपींकडून २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मल्हारी रघुनाथ पालवे वय २८, रा. कसबापेठ, पाथर्डी) असे ( अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नगर-पाथर्डी रोडवरील तिसगाव शिवारात असलेल्या हॉटेल मित्रधनमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात आहे, अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी त्या हॉटेलवर छापा टाकला असता, हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर तीन महिला मिळून आल्या. पालवे याने वेश्या व्यवसाय सुरु असल्याची कबुली दिली.
Web Title: Raid on prostitution business, three women freed