संगमनेर तहसील विभाजनाचा मुद्दा, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांना सणसणीत टोला
Breaking News Sangamner: Radhakrishana Vikhe Patil on Balasaheb Thorat.
अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील तहसील कार्यालयाचे विभाजन करून आश्वी येथे उप तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला होता. त्याला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला होता.
संगमनेर तालुक्याचे प्रशासकीय विभाजन करुन नव्याने आश्वी बुद्रुक येथे ‘अपर तहसील कार्यालय’ स्थापन करण्याच्या प्रशासकीय प्रस्तावाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे. यावरतीच बोलताना मंत्री विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना टोले लगावले.
त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संगमनेरखुर्द मधील काही गाव ही आधी मंडल कार्यालयाला जोडली गेली होती. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांची गैरसोय होत असल्याने आमदार अमोल खताळ यांनी सांगितले असून त्याला आपण तत्वतः मान्यता दिली आहे. त्या मंडळाची पुनर्रचना करावी आणि तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
आपण फक्त तहसील कार्यालयाचे विभाजन करतोय, तालुक्याचे नाही. त्यामुळे काही लोक जाणीवपूर्वक स्वातंत्र्य काळातील लढाई लढावी लागेल, असे बोलत आहेत. मात्र कुठल्याही प्रकारचे तालुक्याचा विभाजन होणार नाही. यापूर्वी स्थानिक नागरिक स्वातंत्र्यात नव्हते, या निवडणुकीनंतर त्यांना स्वातंत्र मिळालं, असे विखे म्हणाले.
दरम्यान आश्वी येथे उप तहसील कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखला असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे.
Web Title: Sangamner Tehsil division, Balasaheb Thorat of Radhakrishna Vikhe in a festive
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News