संगमनेर: चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात
Breaking News | Sangamner Accident: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला.
संगमनेर : तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. ही घटना शनिवार (ता.१) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महामार्गावरील चंदनापुरी घाटात पुणे-नाशिक लेनवर शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान एक कार दुभाजकाला धडकल्यामुळे कार थेट रोडच्या मध्यभागी आली.
याच दरम्यान पाठीमागे बसही रोडवर थांबली होती. बसच्या पाठीमागे कार उभी होती, तसेच याच कारच्या बाजूला आणखीन दुसरी कार उभी होती. याच दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने वाहनाना जोराची धडक दिली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.
अपघात झाल्याची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमींना औषधोपचारांसाठी संगमनेरला नेण्यात आले होते, तर अपघातामुळे वाहतूकही खोळंबली होती. क्रेनवाल्यास पाचारण करण्यात आल्यानंतर रोडवरून अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, या पाच वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातांत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अगोदर सकाळी वरूडी फाटा येथे अपघात झाला होता. शनिवारी दिवसभर अपघातांचा सिलसिला सुरूच होता. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने सातत्याने अपघात होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
Web Title: freak accident involving five vehicles at Chandnapuri Ghat
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News