लाच स्वीकारताना सहायक पोलिस उपनिरीक्षक रंगेहाथ
Breaking News | Bribe: वीस हजार रुपयांची लाच मागत त्यातील १० हजार रुपये स्वीकारताना मागणी करणाऱ्या देवळा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस उपनिरीक्षकास शनिवारी (दि.१८) रंगेहाथ पकडण्यात आले.
देवळा: गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागत त्यातील १० हजार रुपये स्वीकारताना मागणी करणाऱ्या देवळा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस उपनिरीक्षकास शनिवारी (दि.१८) रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदारास गुन्ह्यात अटक न करता केवळ नोटीस बजावण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक पोलिस उपनिरीक्षक कैलास यशवंत जगताप यांस रंगेहाथ पकडण्यात आले. संशयिताने या आधीही दोन लाख पाच हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. त्याच्याविरुद्ध देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Assistant Sub-Inspector of Police red-handed while accepting bribe
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News