संगमनेर: मांजामुळे दुचाकीस्वराचा गळा चिरला
Breaking News | Sangamner: एका तरुणाचा गळा चिरल्याने त्याची प्रकृती चिंताजनक.
संगमनेर: दुचाकीवरून जाणारे दोघेजण रस्त्यात आडव्या असलेल्या पतंगाच्या मांज्याला अडकून जखमी झाले. येथील नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरच्या बाह्यवळण रस्त्यावर कृष्णा लॉन्स समोर नुकतीच ही घटना घडली. या घटनेमध्ये एका तरुणाचा गळा चिरल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून दुसरा किरकोळ जखमी झालेला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत संजय कटारनवरे (वय २२, रा. सिन्नर, जि. नाशिक) व डॉ. प्रफुल्ल घुसळे (वय २८, रा. संजय गांधी नगर, संगमनेर) हे दोघे तरुण आपल्या दुचाकीवरून सिन्नर वरून संगमनेरकडे येत होते. ते संगमनेर जवळ आले असता, बाह्य वळण रस्त्यावर ही घटना घडली. या संगमनेर येथील घटना; दुसरा जखमी इजा झाल्याने त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनिकेत हा विखे पाटील फाऊंडेशनच्या अहिल्यानगर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आमची परिस्थिती अतिशय हलाखीची असून उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. दात्यांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन अनिकेतचे वडील संजय कटारनवरे यांनी केले आहे.
दरम्यान, या घटनेची फिर्याद डॉ. प्रफुल्ल रामनाथ घुसळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत कटारनवरे याच्या गळ्याला श्वास नलिकेजवळ मोठ्या प्रमाणात घटनेमध्ये मांज्यामुळे अनिकेत कटारनवरे हा गंभीर जखमी झाला. त्याच्या गळ्याला मोठी जखम झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
Web Title: two-wheeler’s throat was cut due to manja
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News