नवरा परदेशात, घरमालकाने 8 वर्ष भाडेकरू महिलेवर केले अत्याचार
Breaking News | Mumbai Crime: भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका महिलेवर घरमालकाने तब्बल ८ वर्ष शारीरिक अत्याचार (sexual abused) केल्याची घटना.
नवी मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका महिलेवर घरमालकाने तब्बल ८ वर्ष शारीरिक अत्याचार (sexual abused) केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेचा पती बाहेर देशात कामाला असल्याचा फायदा घेत शारीरिक अत्याचार केले आणि पीडित महिलेचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत पीडित महिलेनं अखेर रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नवी मुंबईतील घनसोली नवघर आळीत ही घटना घडली आहे. भाड्याने राहणाऱ्या एका महिलेवर रूम मालक प्रदीप रामकृष्ण पाटील याने 2016 ते 2024 पर्यंत असा तब्बल 8 वर्ष भाडेकरू महिलेवर शारीरिक अत्याचार केले. पीडित महिलेनं 2016 पासून ते 2024 पर्यंत नवघर आळी, घणसोलीतील प्रदीप रामकृष्ण पाटील याच्या घरी भाड्याने राहायला होती. पीडितेचा पती हा परदेशात नोकरीसाठी असल्याने पीडित महिला या रूमबाबत काही अडचण असल्यास प्रदीप पाटील यांच्याशी संपर्क करत होत्या. त्यामुळे दोघांमध्ये संभाषण हळूहळू वाढत गेलं. दरम्यान पीडित महिलेचा पती परदेशात कामाला असल्याची माहिती प्रदीप पाटील याला कळाली. त्यानंतर या आरोपी प्रदीप पाटीलने महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र या गोष्टीला पीडितेनं नकार देताच प्रदीप याने महिलेसोबत जबरदस्ती शारीरिक अत्याचार केला.
त्याने मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवले. या घटनेबाबत कुठे वाच्यता करशील तर हे फोटो आणि व्हिडिओ नवऱ्याला पाठवण्याची आणि सोशल मीडिया व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून पीडितेनं नराधम रूम मालक प्रदीप पाटील याचा जबरदस्तीचा शारीरिक अत्याचार तब्बल 8 वर्षे सहन करत होती. मात्र नराधम प्रदीप यांनी पीडितेच्या मुलीवर नजर टाकल्यावर महिलेनं धीटपणा दाखवून घडलेला सर्व प्रकार तिच्या पतीला सांगितला. पती परदेशातून भारतात परत आल्यावर रूम मालक प्रदीप रामकृष्ण पाटील याच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Husband Abroad, Landlord Abused Tenant Woman for 8 Years
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News