संगमनेर: चाकू, कोयत्याचा धाक दाखवत दागिन्यांसह रोकड लुटली
Sangamner Crime: महिलांना चार अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील आंचीदुमाला येथील महिलांना चार अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.१५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आंबी दुमाला येथील रावसाहेब अशोक ढेरंगे यांची पत्नी मुक्ता या घराबाहेर सांडपाणी टाकण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेली ढेरंगे हे घरातच होते. याचवेळी मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला महणून घराच्या दरवाजातून ते बाहेर आले. त्यावेली एका अनोळखी इसमाने पत्नी मुक्ता हिच्या मानेजवळ कोयता धरला होता, तसेच पुतण्या व भावजयी यांनाही कोयत्याचा धाक दाखवला होता. त्यावर त्यांना विचारले की काय झाले? त्यावेळेस एकजण ढेरंगे यांना म्हणाला की ही तुझी कोण आहे? त्याचेली ती माझी पत्नी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर वरील चोरट्यांनी तुमच्याकडे सोने, पैसे असेल तेवढे आम्हांला द्या, नाही तर तुम्हांला कोणालाच जिवंत सोडणार नाही असे म्हणाल्याने पत्नी मुक्ता हिने आणि भावजय मंदा हिने गल्ल्यातील मंगळसूत्र, कानातले तसेच रोख रकम चार हजार रुपये काढून दिले ते घेऊन चोरटे पळून गेले. पुढे जाऊन माधव पांडुरंग ढेरंगे हे आमचा आरडाओरडा झाल्याने त्यांच्या घराबाहेर आले. त्यावेळी बार अज्ञात चोरट्यांनी त्यांना व त्यांची पत्नी शीतल यांच्याही गळ्याला कोयला लावून माधव यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, पत्नी शीतल यांचे मिनीगंठण व आई चंद्रकला यांचे मनी मंगळसूत्र व कानातील वेळ बळजचरीने काढून घेतले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घारगाव पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही तत्काळ येत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे बांना कळवले. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या प्रकरणी रावसाहेब अशोक डेरेंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोर चोरट्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. एस. मरभळ करत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Web Title: Looted cash along with jewelries by showing fear of knife, coyotes
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News