Home महाराष्ट्र स्कूल बसचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्कूल बसचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Satara Crime: शाळेत सोडणार्‍या खासगी स्कूल बस चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

A school bus driver abused a minor girl

सातारा : शाळेत सोडणार्‍या खासगी स्कूल बस चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नितीन राजाराम पवार (वय 28, रा. पाटखळ माथा ता. सातारा) व पुष्कर कांबळे (रा. सदरबझार, सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, नितीन पवार याची खासगी स्कूल बस असून तो दररोज मुला-मुलींना शाळेत बसने सोडतो. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. त्याने मुलीशी ओळख वाढवली व संपर्क करू लागला. यानंतर त्याने ऑक्टोबर महिन्यात मित्र पुष्कर कांबळे याच्या सदरबझार येथील घरात पीडित मुलीला नेले. तेथे नितीन पवार याने या मुलीवर अत्याचार केले. तसेच, संशयिताने मुलीसोबत फोटो काढले. यामुळे पीडित मुलगी अधिकच घाबरली व तिने कोणाला याबाबतची माहिती दिली नाही.

या सर्व घटनेनंतर पीडित मुलगी घरात अबोल राहू लागली व घाबरल्यासारखी राहू लागली. यामुळे आईला शंका आल्याने तिने मुलीला बोलते केले असता मुलीने घडलेल्या घटनेची माहिती दिली. मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोनि राजेंद्र मस्के, पोलिस श्री देशमुख, राहूल घाडगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. महिला पोलिस अधिकारी व महिला पोलिसांनी मुलीकडून सर्व माहिती घेतली व दोघांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना रात्री उशीरा दोघांना अटक केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: A school bus driver abused a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here