Home संगमनेर संगमनेरात अतिक्रमण हटविण्याचे काम सुरु मात्र…. असा प्रश्न निर्माण

संगमनेरात अतिक्रमण हटविण्याचे काम सुरु मात्र…. असा प्रश्न निर्माण

sangamner News: संगमनेर शहरात वर्षांनुवर्षे अतिक्रमणाचा विषय गंभीर. अतिक्रमण हटवल्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास मात्र अतिक्रमण तेवढ्यापुरते काढले जाते अन काही दिवसांनी जैसे थे. शहर कधी अतिक्रमणमुक्त होणार? असा प्रश्न ही निर्माण झाला.

Encroachment removal work started in Sangamner

संगमनेर : शहरात मंगळवारपासून नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी सकाळपासून अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली. अतिक्रमण हटवल्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

संगमनेर शहरात वर्षांनुवर्षे अतिक्रमणाचा विषय गंभीर बनला आहे. तेवढ्यापुरते अतिक्रमण काढले जाते; मात्र पुन्हा ‘जैसे थे’ होते. यामुळे शहर कधी अतिक्रमणमुक्त होणार? असा प्रश्न ही निर्माण झाला होता. त्यामुळे नगरपरिषदेने कडक पाऊल उचलले होते. प्रवरा नदीपासून ते शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील १३२ के. व्ही. उपकेंद्रापर्यंत असलेल्या १३० अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. तत्काळ अतिक्रमणे काढण्यास सांगितले होते. बसस्थानक ते शेतकी संघापर्यंत फुटपाथवरील छोट्या-मोठ्या अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले होते. जे अतिक्रमणधारक अतिक्रमण काढणार नाहीत, ते पोलिस बंदोबस्तात काढण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले होते.

मंगळवारी प्रवरा पुलाजवळून तीन ते चार जेसीबीच्या माध्यमातून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू केले. दुपारी तीनबत्ती चौकापर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली होती. पक्की बांधकाम असलेले अतिक्रमणेही काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, शहराचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख सर्वजण अतिक्रमणस्थळी लक्ष ठेवून होते.

Web Title: Encroachment removal work started in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here