Home अकोले लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

Nagpur Suicide: एका दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवशीच आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्येअगोदर सोशल माध्यमांवर व्हिडीओ शेअर करत आत्महत्येचे कारण स्पष्ट केले.

suicide of the couple on their wedding anniversary was shared by sharing the reason

नागपूर : एका दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवशीच आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्येअगोदर सोशल माध्यमांवर व्हिडीओ शेअर करत आत्महत्येचे कारण स्पष्ट केले. मार्टिननगरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

जेरील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रीप (वय ५४) व अॅनी जेरील मॉनक्रीप (४५) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही काळापासून ते बेरोजगार होते. त्यांच्यावर कर्जही होते. लग्नाला २५ हून अधिक वर्षे उलटूनही मूल होत नव्हते. त्यामुळे त्यांचा तणाव आणखी वाढला होता. यातून त्यांनी सहा जानेवारीला लग्नाच्या वाढदिवशीच टोकाचा निर्णय घेतला. मध्यरात्रीनंतर त्यांनी गळफास घेतला. व्हॉट्सअॅपवर स्टेट्स जेरील व अॅनी यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या पोशाखातच गळफास घेतला. सोमवारी ते फिरायला गेले होते. आधी त्यांनी व्हिडीओ काढला व तो व्हॉट्सअॅपवर स्टेट्स म्हणून ठेवला. यात त्यांनी आत्महत्येचे कारण  सांगितले व कुटुंबीयांची माफी मागितली. सोबतच सुसाइड नोटही लिहिली होती. अंत्यविधीसाठी ७५ हजार रुपये घरात ठेवल्याचे त्यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केले.

Web Title: suicide of the couple on their wedding anniversary was shared by sharing the reason

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here