दबक्या पावलांनी आला, गोळ्या झाडल्या, व्यावसायिकाची हत्या
Murder Case: एका अज्ञात हल्लेखोराने चष्म्याच्या व्यापारी शम्स तबरेज अंसारीच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
मीरा रोड: शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या शांति शॉपिंग सेंटरमध्ये एका अज्ञात हल्लेखोराने चष्म्याच्या व्यापारी शम्स तबरेज अंसारीच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सीसीटीवी कॅमेरात कैद झालेल्या फुटेजमध्ये स्पष्टपणं दिसत आहे की, आरोपी गोळीबार करण्याच्या ठिकाणी खूप आरामत येत आहे. हत्या केल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी आपल्या चेहऱ्याला काळ्या रंगाच्या मास्कने झाकलं होतं. आरोपी गोळीबार करत असतानाच्या काही सेकंदांनंतर तो घटनास्थळावरून वेगाने पळून जाताना दिसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोडचा शांती शॉपिंग सेंटरमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मोहम्मद तबरेज अन्सारी (वय 35) असं मयत तरुणाचं नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री दहा वाजता दुकाना बाहेर उभा असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. यात मोहम्मदचा जागीच मृत्यू झाला आहे. एका गुन्ह्यात मोहम्मद हा साक्षीदार असल्याने त्याला मागच्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अन्सारी साक्षीदार असल्याच्या कारणाने त्याला धमक्या येत होत्या. याच कारणास्तव त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, हत्या घडल्यानंतर नयानगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची तपासणी करण्यात येत असून, हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत. या घटनेमुळे शांती शॉपिंग सेंटर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: heavy footstep came, shots were fired, the businessman was killed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News