Home नाशिक मोकळा वेळ तोच ठरला अखेरचा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मोकळा वेळ तोच ठरला अखेरचा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Gateway of India Boat Accident: नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

gateway of India boat accident

मुंबई: नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचारासाठी आलेल्या अहिरे कुटुंबीयांनी दुपारच्या मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी फिरण्याचा प्लॅन केला. तोच त्यांचा आयुष्याचा अखेर ठरला. सगळे जण आनंदात अचानक नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या पिंपळगाव येथून हे दाम्पत्य अंधेरीतील रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी आले होते. या घटनेने अहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुपारचा मोकळा वेळ असल्याने त्यांनी एलिफंटा लेणीला जाण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे लहान बाळासह बोटीने प्रवास सुरू झाला. मात्र हा प्रवास त्यांचा शेवटचा असेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यांचा अहिरे यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे.

Web Title: gateway of India boat accident that-free-time-turned-out-to-be-the-end-of-life

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here