Home पुणे महिलेशी प्रेमसंबंध असल्‍याच्‍या संशयातून तरुणाची निर्घुण हत्या

महिलेशी प्रेमसंबंध असल्‍याच्‍या संशयातून तरुणाची निर्घुण हत्या

Breaking Pimpari Crime News: नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्‍याच्‍या संशयातून धारदार शस्‍त्राने वार करून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

young man was brutally murdered on suspicion of having an Love affair

पिंपरी : एका नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्‍याच्‍या संशयातून धारदार शस्‍त्राने वार करून एका तरुणाची  हत्या करण्‍यात आला होती. ही घटना गुरुवारी (5 डिसेंबर) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास चर्‍होली येथे घडली. अवघ्‍या 12 तासांच्‍या आता पोलिसांच्‍या खंडणी विरोधी पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

सचिनकुमार लखीदर राय (23, रा. बंगरी, जि. मुझफ्फरपुर, बिहार) असे  हत्या झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. गौतम रामानंद राय ( 22, रा. तेजस रेसीडन्सी, मंगलनगर, वाकड. मूळगाव मु. बंगरी पो. मरवन ता. काटी जि. मुजफ्फरपूर, राज्य-बिहार) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. तर त्‍याचा अल्‍पवयीन साथीदार (वय 17 वर्ष 6 महिने, रा. मोहीतेवाडी, ता. मावळ, जि. पुणे) यालाही पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्‍हाण यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चर्‍होली येथे सचिनकुमार राय याचा खून झाल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार खंडणी विरोधी पथक घटनास्‍थळी दाखल झाले. त्‍यांनी आसपासचे सीसीटीव्‍ही तपासले असता त्‍यावरून आरोपी गौतम राय याचे नाव निष्‍पन्‍न केले. पोलीस हवालदार आशिष बोटके यांना मिळालेल्या माहितीवरून आणि सहायक फौजदार सुनील कानगुडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून काळाखडक, वाकड येथून पहाटे सव्‍वातीन वाजताच्‍या सुमारास आरोपीला ताब्‍यात घेतले. त्‍याने दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे अल्‍पवयीन मुलालाही ताब्‍यात घेण्यात आले.

या प्रकरणात हत्या झालेले सचिनकुमार राय याचे आरोपीचे नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्‍याचा संशय आरोपीला होता. या कारणावरून नातेवाईक महिलेने घरही सोडले होते. त्‍यामुळे सचिनकुमार याला धडा शिकविण्‍यासाठी त्‍याचा खून केल्‍याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. खंडणी विरोधी पथकाने आरोपीला दिघी पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले आहे.

Web Title: young man was brutally murdered on suspicion of having an Love affair

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here