शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग…
Breaking News | Ajit Pawar: अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत भाजपसमोर एक अट ठेवली.
मुंबई: महायुती सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातला आहे. तत्पूर्वी आदल्या रात्री मुंबईत महायुतीच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्याची माहिती आता समोर आली आहे. अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत भाजपसमोर एक अट ठेवली. त्यामुळे काल रात्री वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडल्याचे सांगितले जाते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मंत्रिपदं फायनल करा, त्यानंतर आम्ही आमच्या मंत्रिपदांची चर्चा करु, असे अजित पवार यांनी भाजप नेतृत्त्वाला सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच भूमिकेमुळे बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खातं कायम राहणार यासोबतच एकनाथ शिंदेना जितकी खाती मिळतील तितकीची खाती आम्हाला देखील मिळायला हवीत, ही आमची भूमिका कायम असल्याची माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याने दिली. अजित पवार यांच्या पक्षाकडून यंदा मंत्रिमंडळात जुन्याऐवजी नव्या चेहऱ्यांना देखील संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
Web Title: Ajit Pawar’s condition before the BJP before the swearing-in ceremony
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study