आ. थोरातांविरोधात लढण्याचे सुजय विखेंच स्वप्नं भंगले, विधानसभेतून पत्ता कट
Maharashtra Assembly Election 2024 | Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe: संगमनेर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने अमोल खताळ यांना उमेदवारी दिली.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये अनेक मोठे बदल पाहण्यास मिळत आहे. अहिल्यानगरमध्ये मागील काही दिवसांपासून वसंत देशमुख यांच्या विधानामुळे तीव्र पडसाद उमटले.
भाजपचे नेते सुजय विखे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा रंगली होती. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे. संगमनेर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने अमोल खताळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये पुन्हा एकदा थोरात विरुद्ध खताळ लढत पाहण्यास मिळणार आहे.
अर्ज दाखल करण्याची आज डेडलाईन आहे. शिवसेना शिंदे गटाने आपली नवीन यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण 15 उमेदवारांना तिकीट दिले आहे. अहिल्यानगरमध्ये लोकसभा निवडणुकीला पराभूत झालेले भाजपचे सुजय विखे पाटील यांचं नाव विधानसभेसाठी चर्चेत आलं.
सुजय विखेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सभा सुद्धा घेतल्यात. त्यातच वसंत देशमुख यांनी विखेंच्या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे अहिल्यानगरचं राजकारण चांगलंच पेटलं होतं. याचा फटका आता विखेंना बसला आहे. संगमनेरमधून शिवसेना शिंदे गटातून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमोल खताळ हे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार आहे.
Web Title: Sujay Vikhe’s dreams of fighting against Thorats were dashed, his address was cut from the Assembly Election 2024
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study