भाड्याने खोली पाहण्यासाठी आले अन तरुणाचा खून केला
Breaking News | Pimpri Crime: भाड्याने घेण्यासाठी खोली पहाण्यासाठी आलेल्यांना दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याने झालेल्या झटापटीत चौघांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यु.
पिंपरी: भाड्याने घेण्यासाठी खोली पहाण्यासाठी आलेल्यांना दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याने झालेल्या झटापटीत चौघांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यु झाला. पाच दिवसांनी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतिश अर्जुन देडगे (वय ३१, रा. साळुंखे वस्ती, माण, ता. मुळशी) असे खून झालेल्याचे नाव आहे. हरी गणपत वाघमोडे (वय ३३, रा. गुजरनगर, थेरगाव), अविनाश रमेश गव्हाळे (वय २८, रा. लक्ष्मणनगर, थेरगाव), विपुल सुरेश कुंभार (वय २७, रा. लक्ष्मणनगर, थेरगाव), संदीप कांतीलाल शेडगे (रा. सदगुरु कॉलनी, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सतिश देडगे हा त्याच्या राहते घरी दारु पिऊन आला होता. त्यावेळी घरमालक यांच्या ओळखीचे आकाश बापु हेगडे यास खोली भाड्याने पाहिजे होती. ते पाहण्यासाठी त्याचे चौघे मित्र त्या ठिकाणी आले होते. सतिश देडगे याची रुम खाली होणार असल्याने घरमालक यांनी त्याची खोली बघण्यासाठी हरी वाघमोडे व त्याच्या मित्रांना तेथे पाठविले होते. त्यावेळी सतीश देडगे हा त्याचे खोलीत दारु पिऊन पडला होता. ते खोली बघत असताना सतिश याने हरी व त्याचे मित्रांना शिवीगाळ करु लागला.
त्यावेळी त्यांनी शिव्या देऊ नकोस, खोली बघायला आलो आहे, असे सांगितले. तरीही तो शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर मारायला धावून गेला. त्यावेळी त्यांच्याशी झटापटी करु लागला. त्यांनी सतिश देडगे याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकत नसल्याने त्यांनी सर्वांनी मिळून सतिश याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बाजूला पडलेल्या लाकडी प्लायच्या पट्टीने मारहाण केली. ही पट्टी वर्मी लागल्याने सतिश निपचित पडला. त्यातच त्याचा मृत्यु झाला. सतिश निपचित पडला असल्याचे पाहून खोली पाहण्यासाठी आलेले घाईघाईत निघून गेले. काही वेळाने सतिश खोलीत पडला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा डॉक्टर तपासणीपूर्वीच मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. हिंजवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद करुन तपास सुरु केला. तपासामध्ये खोली पाहण्यासाठी आलेल्यांकडून हा खुन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी सांगितले.
Web Title: Came to see the rented room and killed the young man
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study