Home अहमदनगर अहिल्यानगर: हॉटेलवर देह व्यवसाय, दोन महिलांची सुटका

अहिल्यानगर: हॉटेलवर देह व्यवसाय, दोन महिलांची सुटका

Breaking News | Ahmednagar: पोलिसांना त्या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याची खात्री पटली. त्यानंतर छापा टाकून हॉटेलमधील एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

Hotel prostitution, two women rescued

अहिल्यानगर : जिल्ह्यातील राहुरी येथील वेश्याव्यवसाय उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा शेवगाव तालुक्यातील शेवगाव ते गेवराई रोडवरील हॉटेल राजयोगवर शुक्रवारी (दि. १९) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी की, , शेवगाव पोलिस स्टेशन हद्दीतील हॉटेल राजयोग येथे वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना मिळाली होती. यानुसार अहिल्यानगरचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनानुसार धाकराव यांच्यासह पोलिस अंमलदार संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे, ज्योती शिंदे, रणजीत जाधव यांचे पथक व शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे, पोलिस अंमलदार प्रियंका शिरसाठ, किशोर पालवे, असे संयुक्त पथक कारवाईसाठी रवाना झाले होते.

 पोलिसांनी खात्री करण्याकरिता पथकातील एका पोलिस अंमलदार बनावट ग्राहक म्हणून पाठविले. पोलिसांना त्या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याची खात्री पटली. त्यानंतर छापा टाकून हॉटेलमधील अमर मारुती ढाकणे (वय २४, रा. हसनापूर, ता. शेवगाव) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून वीस हजार किमतीचा मोबाइल व एक हजार रुपये रोख, असा मुद्देमाल जप्त केला. यानंतर पाहणी केली असता, हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये असलेल्या दोन महिलांची पथकाने सुटका केली. याप्रकरणी अमर मारुती ढाकणे, बाबासाहेब अंधारे (रा. शेवगाव) यांच्याविरुद्ध पोलिस हवलदार ज्योती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शेवगाव पोलिस करीत आहेत.

Web Title: Hotel prostitution, two women rescued

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here