Home महाराष्ट्र रेल्वे पुलावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या

रेल्वे पुलावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या

Breaking News | Ratnagiri Suicide: रेल्वे पुलावरून  तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना, मृतदेहाचे अक्षरशः तुकडे.

Youth committed suicide by jumping from railway bridge

रत्नागिरी: शहराजवळील डी मार्ट येथील रेल्वे पुलावरून  तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्टला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्या करणारा तरुण शहरामधील मुरुगवाडा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरेंद्र राजेंद्र किर (वय ३८ रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक निखारर्गे,  शिवगण, हवालदार मंदार मोहिते, हवालदार रुपेश भिसे, हवालदार रोशन सुर्वे, अजय कांबळे आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतुदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने पोलीसांकडून मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागत आहे.

सुरेंद्रला दारुचे व्यसन होते. सुरेंद्र हा दुपारच्या सुमारास आत्महत्या करण्याच्या हेतूने शहरातील कुवारबाव येथील डी मार्टच्या जवळ असणाऱ्या रेल्वे पुलावर आला. तिथून त्याने बहिणीला फोन लावून मी आत्महत्या करणार असल्याची कल्पना दिली होती. पुलावर येऊन त्याने थेट पुलावरून जाणाऱ्या रेल्वे गाडीवर उडी घेत आत्महत्या केली. मृतदेहाचे अक्षरशः तुकडे झाले होते. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांना माहिती मिळताच तातडीने पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Web Title: Youth committed suicide by jumping from railway bridge

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here