अनैतिक संबंधाला विरोध, पत्नीला विष पाजून पळणाऱ्या पतीला अटक
Breaking News | Ahmednagar: अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून पत्नीला विष। पाजून तिला ठार मारून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी पतीला अटक.
श्रीगोंदा : अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून पत्नीला विष। पाजून तिला ठार मारून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी पतीला श्रीगोंदा पोलिसांनी पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील डोंगरात पाठलाग करून पकडले. बापू झुंबर दातीर (रा. सप्रेवाडी, ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
११ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर नातेवाइकांनी तिला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान सोमवारी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी मयत महिलेच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय
पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल्ल मुकेशकुमार बडे, पोलिस नाईक गोकुळ इंगवले, आनंद मैड, संभाजी गर्जे, शरद चोभे यांनी पळून जाणाऱ्या बापू दातीर याला सुपा परिसरातून अटक केली.
अनैतिक संबंधाला विरोध
बापू दातीर याच्या अनैतिक संबंधाला त्याची पत्नी संगीता (वय ५०, रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंदा) हिचा विरोध होता. याबाबत ती त्याला वारंवार समजावून सांगत होती. याच गोष्टीचा मनात राग ठेवून बापू याने पत्नीला विष पाजले.
Web Title: immoral relationship, arrest of husband who ran away after poisoning his wife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study