सहावं लग्न करण्यासाठी आलेल्या नवरी मुलीचा भांडाफोड
Breaking News | Ahmednagar: पाच लग्न करून सहावं लग्न करण्यासाठी तयारीत.
करंजी : गेल्या काही दिवसापासून मुलींच्या संख्येत मोठी घट झाल्याने तरुणांचे हात पिवळे करणे आई, वडिलांसाठी मोठी तारेवरची कसरत ठरत आहे. बेरोजगार असणाऱ्या तरुणांचे देखील प्रमाण झपाट्याने वाढत आहे. बुद्धिमत्तेच्या बाबतीतही मुलांपेक्षा मुली हुशार असल्याचे नेहमीच दिसून येत आहे.
करंजी गावाजवळील एका गावच्या वेरोजगार असलेल्या तरुणाचे हात पिवळे करण्यासाठी संभाजीनगर येथून अंदाजे ३५ वय वर्ष असलेली एक मुलगी नवरी म्हणून आली मुलीकडच्या व्यक्तींना अडीच लाख रुपये देऊन हा संपूर्ण लग्न सोहळा पार पाडण्याचे ठरलेले होते. नवरी मुलगी व तिच्याबरोबरच्या तीन, चार महिला एका चारचाकी वाहनाने नवरदेवाच्या गावांमध्ये दाखल झाले. मुलगी एवढी मेकअप करून आली होती की, तिने यापूर्वी पाच लग्न करून सहावं लग्न करण्यासाठी ती सज्ज झाली असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून कोणालाही उमगले नाही. लग्न सोहळा वृद्धेश्वर परिसरात पार पडणार होता त्या ठिकाणीच सर्व काहीदेणे घेणे होणार होते, त्यामुळे त्या ठिकाणी देखील सर्व तयारी करण्यात आली होती. परंतु म्हणतात ना वासरात शहाणी गाय त्या म्हणी प्रमाणे काही जाणकार व्यक्तींना या नवरी मुलीसह तिच्यासोबत आलेल्या महिलांबद्दल संशय आला आणि मग त्यांनी लग्न सोहळा पार पाडण्यापूर्वीच या नवरी मुलीसह तिच्यासोबत आलेल्या तीन महिलांची शेलक्या शब्दात चौकशी करत त्यांना चोपून काढण्याची तयारी करताच त्या नवरी मुलीसह तिच्यासोबत आलेल्या तीनही महिला पोपटासारख्या बोलू लागल्या. आम्हा तिघींना प्रत्येकीला ५० हजार रुपये मिळणार होते आणि नवरी मुलीला १ लाख मिळणार होते, असे आमचे अडीच लाख रुपयांत चौघींचे ठरले होते. काही दिवसानंतर मुलगी नेहमीप्रमाणे या मुलाला सोडून पळून पुन्हा निघून जाणार होती परंतु आता आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, आम्ही तुम्हाला सर्व काही खरे सांगितले आहे, आमची सुटका करा, अशा विनवण्या केल्याने उपस्थितांनी देखील यांनी खरे सांगितले आहे, आता आपले अडीच लाखही वाचले आणि आब्रूही, या मध्यस्थी लोकांनी नवरी मुलगी व तिच्या सोबतच्या तीन महिला ज्या मार्गाने आल्या होत्या, त्या मार्गानेच त्यांना काढून दिले. असले प्रकार एकाच गावात घाडताहेत असे नव्हे यापूर्वी देखील असे प्रकार अनेक गावात घडल्याचे ऐकवात आहे.
गेल्या काही दिवसापासून मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे मुलाच्या लग्नासाठी त्याच्या आई वडिलांना अशा पद्धतीने फसवण्याचे काम काही टोळ्यांकडून सुरू झाले असून या प्रकारामुळे नवरा मुलाच्या आई वडिलांचे लाखो रुपये वाया जात असून, त्यांची अशा प्रकारामुळे बेअब्रू देखील होत आहे. अशा टोळ्यांपासून आता प्रत्येक मुलाच्या आई, वडिलांनी सावध होण्याची गरज आहे. पाच नवऱ्या मुलांना चुना लावून सहावं लग्न करण्यासाठी तयार झालेल्या या नवरी मुलीच्या धाडसाचे देखील कमालच म्हणावी लागेल. किती लग्न केल्यानंतर ही नवरी मुलगी कोणाचातरी प्रपंच करण्यासाठी थांबणार होती, असा देखील प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.
Web Title: Wife and daughter who came to marry for the sixth time
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study