डॉक्टर पत्नीची हत्या करत पतीची आत्महत्या
Breaking News | Suicide News: पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने आयुष्य संपविल्याचा संशय.
मुंबई : गोरेगाव येथील एका सोसायटीत दाम्पत्य मृतावस्थेत आढळले. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने आयुष्य संपविल्याचा संशय पोलिसांना आहे. किशोर पेडणेकर (५४) आणि डॉ. राजश्री पेडणेकर असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. किशोर हे मानसिक तणावाखाली होते. गोरेगाव पोलिसांनी दोन अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे इमारतीच्या तळमजल्यावर बँकेच्या कार्यालयात तैनात असलेल्या चौकीदाराने सोसायटीच्या आवारात जखमी अवस्थेत व्यक्ती पडल्याची माहिती मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. किशोर पेडणेकर असे व्यक्तीचे नाव असून, त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली होती. पोलिस घटनास्थळी आले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या गळ्यातील साखळीत घराची चावी होती. त्याआधारे पोलिस घरी पोहोचले. तेव्हा बेडरूममध्ये राजश्री मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा होत्या. त्यांच्या नाका-तोंडातून रक्त येत होते.
Web Title: Husband commits suicide by killing doctor wife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study