भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले
Breaking News | Bhandardara: धरणात बुधवारी १४९ दलघफू नवीन पाण्याची आवक.
भंडारदरा: 11039 दलघफू क्षमतेच्या भंडादरातील पाणीसाठा 10037 दलघफू (90.92%) इतका झालेला आहे. सद्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमान बर्यापैकी असल्याने धरणामध्ये येणार्या पाण्याची आवक बघता तसेच भंडारदरा धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काल बुधवारी दुपारी 4 वा. धरणाच्या सांडव्यामधून 609 क्युसेकने विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6 वा. तो 1439 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर होता. मात्र, मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाचे प्रमाण कमी झाले. पुन्हा बुधवारी पावसाने जोर धरला. त्यामुळे भंडारदरा धरणात बुधवारी १४९ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. बुधवारी सायंकाळी चार वाजता धरणाचा एक लोखंडी वक्र दरवाजा अर्ध्या फुटाणे उचलत ६०९ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली, असे धरण शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी सांगितले.
या अगोदर धरणातून वीजनिर्मितीसाठी ८३० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे आता या धरणातून एकूण १ हजार ४३९ क्युसेकने पाणी नदीपात्रात पडत आहे. या पाण्यामुळे आता निळवंडे जलाशयातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे. सायंकाळी सहा वाजता निळवंडे धरणातील पाणीसाठा ४ हजार ४७७ दलघफू इतका होता.
Web Title: Water was released from the Bhandardara dam
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study