शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून ७० हजारांचा ऐवज लुटला
Breaking News | Sangali Crime: दोघांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार (Raped) करून घरातील सहा हजार रुपये हिसकावून पसार, चौघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा.
सांगली | मिरज: निलजी (ता. मिरज) येथे चोरट्यांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सुमारे ७० हजारांचा ऐवज लुटला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिरज तालुक्यातील एका गावात शेत मळ्यात शेतमजुर कुटुंबाचे घरात घुसून चोरी केली. दरम्यान घरात काही नाही अशी विनवणी करणाऱ्या महिलेवर मध्यरात्री सामुहिक अत्याचार केला. यानंतर महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपयांचे दागिने चोरून नेत पोबारा केला. चोरीनंतर घराला बाहेरून कडी लावत तिथून पळ काढला. महिलेने आरडाओरडा केला परंतु चोरटे पसार झाले.
निलजी येथे एका शेतकऱ्याकडे कर्नाटकातील शेतमजूर कुटुंब दोन लहान मुलांसह वास्तव्यास आहे. शुक्रवारी मध्यरात्री चार चोरटे त्यांच्या घरात शिरले. ३० ते ३५ वयोगटातील
चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. चोरट्यांनी शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवून मौल्यवान साहित्याची मागणी केली. महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, पायातील पैंजण, मोबाइल व लहान मुलांचे चांदीचे दागिने लुटले. त्यानंतर दरवाजाची बाहेरची कडी लावून चोरटे अंधारात पसार झाले.
यावेळी शेतमजूर दाम्पत्याने आरडाओरड केल्यानंतर काही वेळाने चौघेही चोरटे परत आले. दोघांनी पतीस घराबाहेर नेले व दोन चोरटे घरात शिरले. दोघांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून घरातील सहा हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर चारही चोरटे तिथून पसार झाले.
पोलिसांना दुचाकी सापडली…
याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस श्वान पथकासह निलजी गावात पोहोचले. मात्र श्वान पथक घरापासून काही अंतरावर घुटमळले. चोरट्यांची एक दुचाकी पोलिसांना तेथे सापडली. दुचाकीमालकास शोधून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: A farm laborer woman was gang-raped and robbed of 70 thousand
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study