Home अहिल्यानगर अहमदनगरमधील  तलाठी व मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगरमधील  तलाठी व मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Breaking News | Ahmednagar:  तलाठी व मंडळ अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात.

Talathi and Mandaldhikari in Ahmednagar in Bribe Case

Ahmednagar News :  अहमदनगर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात मागील काही दिवसांत अनेक सरकारी कर्मचारी अडकले आहे.  आता एक तलाठी व मंडळ अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत.

सागर एकनाथ भापकर, तलाठी सजा सावेडी, ता.नगर, जिल्हा अहमदनगर, शैलजा राजाभाऊ देवकाते, मंडळ अधिकारी सावेडी, ता. नगर, जिल्हा अहमदनगर असे जाळ्यात अडकलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अधिक माहिती अशी : यातील तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या संयुक्त नावे सावेडी, अहमदनगर येथे 18000 चौरस फूटचा प्लॉट आहे. सदर प्लॉटचे अहमदनगर महानगरपालिका यांचेकडील शासकीय रेखांकन करून सदर प्लॉटचे बांधकाम करण्याकरीता 22 स्वतंत्र उपविभागनी केलेली आहे.

लोकसेवक भापकर, तलाठी सजा सावेडी यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या 22 प्लॉटच्या फेरफार नोंदी ऑनलाइन अपलोड केल्याच्या मोबदल्यात 44,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 40,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व लोकसेविका देवकाते,

मंडळ अधिकारी सावेडी यांनी तक्रारदार यांच्याकडून सदर प्लॉटच्या फेरफार नोंदी मंजूर करण्यासाठी 44,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे मान्य करून लोकसेवक भापकर, तलाठी यांच्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे 22 प्लॉटचे 11,000/- रुपये लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई सापळा अधिकारी – सापळा पर्यवेक्षण अधिकारी- प्रविण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, शरद गोर्डे, तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक छाया देवरे, पो.कॉ. सचिन सुद्रुक, पो.कॉ. बाबासाहेब कराड, चालक पो.हे.कॉ.हारून शेख आदींनी केली आहे.

Web Title: Talathi and Mandaldhikari in Ahmednagar in Bribe Case

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here