घरात एकटी असल्याचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार
Breaking News | Jalgaon Crime: मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नसून अशातच तरूणीवर अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घटना.
जळगाव: राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलासंह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नसून अशातच तरूणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातून समोर आलीय. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून बुधवारी २४ जुलै रोजी सकाळी पिडीत तरूणी ही घरी एकटी असतांना गावात राहणारा तरुणाने तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला.
ही घटना घडल्यानंतर संशयित आरोपी हा पसार झाला. पिडीत तरूणीने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधि तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे हे करीत आहे.
Web Title: Abuse of young woman taking advantage of being alone at home
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study