रिक्षाचालकाने १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार, क्लासला जाण्यासाठी निघाली…..
Breaking News | Vasai Crime: क्लासला जाणार्या १७ वर्षीय तरुणीवर एका अनोळखी रिक्षाचालकाने बलात्कार (Raped) केल्याचा धक्कादायक प्रकार.
वसई: क्लासला जाणार्या १७ वर्षीय तरुणीवर एका अनोळखी रिक्षाचालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार वसईत समोर आला आहे. वालीव पोलीस या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी वसई पूर्वेला राहते. बुधवार १७ जुलै रोजी ती घरातून संगणक क्लासला जाण्यासाठी निघाली होती. पुर्वेला ती एका रिक्षात बसली. तिच्या पायाला असलेले व्यंग रिक्षाचालकाने हेरले. बोलण्यात तिच्या विश्वास संपादन करून तुझे व्यंग ठिक करणारे औषध असल्याची थाप मारली. त्यामुळे मुलीचा विश्वास बसला. त्याने तिला क्लासला न नेता शिरसाड फाटा येथून वज्रेश्वरी येथील एका लॉजवर नेले. उपचाराच्या नावाखाली त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. मात्र नंतर पीडित तरुणी घाबरून तेथून निघून आली. नंतर हा प्रकार तिने आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वालीव पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(२), ७४ सह पोक्सो कायद्याच्या कलम ८,९ (के) १०, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: A 17-year-old girl was raped by a rickshaw puller
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study