Breaking News | Bhandardara Rain: दोन दिवस आषाढ सरींनी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काल शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा वाढला, पाण्याची आवक सुरु.
भंडारदरा: भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात दोन दिवस आषाढ सरींनी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काल शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा वाढला, त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची वाढीव आवक सुरू झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 4013 दलघफू (36.35 टक्के) झाला होता. तर 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 30 टक्क्यांवर पोहचला आहे. काल शनिवारीही अधून-मधून पाऊस कोसळत आहे. काल दिवसभर पडलेल्या पावसाची भंडारदरातील नोंद 5 मिमी झाली.
भंडारदरा परिसरात पाऊस सुरू असल्याने निळवंडे धरणात नवीन पाणी येत आहे. या धरणात काल 1323 दलघफू पाणीसाठा झाला होता. मुळा पाणलोटात गेल्या तीन दिवसांपूर्वी पाऊस विश्रांती घेतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतू शनिवार पहाटेपासून पावसाचे प्रमाण पुन्हा वाढले. परवाच्या तुलनेत काल पावसाचे प्रमाण वाढले. परिणामी सकाळी मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 4705 क्युसेस होता तर सायंकाळी 3416 क्युसेस होता. यामुळे मुळा धरणाकडे पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा 7792 दलघफू (30 टक्के ) झाला आहे. दोन्ही धरणांच्या पाणलोटात पाऊस पुन्हा सुरू झाल्याने भातखाचरांमध्ये पाणी साठू लागल्याने भात आवणीच्या कामाने पुन्हा वेग घेतला आहे.
Web Title: Bhandardara Dam was filled to such a percentage
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study