मराठा आरक्षण नाही, मराठा तरुणीने संपविले जीवन, परिस्थिती बेताची
Breaking News | Maratha reservation Suicide Case: तरुणीने एका चिठ्ठीद्वारे आपल्या भावना व्यक्त करत विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविले. (Suicide)
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील देऊळगाव येथील शिवानी संजय हिवाळे (वय 18) ही युवती बारावीत 72 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. परंतु, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च तिला उचलवत नव्हता.
या शिवाय, मराठा आरक्षण असते तर खर्च कमी लागला असता, या विचारातून तिने एका चिठ्ठीद्वारे आपल्या भावना व्यक्त करत विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविले आहे.. ही घटना बुधवारी सायंकाळी देऊळगाव ताड (ता. भोकरदन) येथे घडली.
शिवानीचे शिक्षण हे आतापर्यंत मामांनी केले. यापुढे खुप शिकावे ही इच्छा तीची होती. तिला बी.ए.च्या प्रथम वर्षाला प्रवेश ही घ्यायचा परतु या हलाखीच्या परिस्थीत असल्याने त्यात मराठा आरंक्षण ही नाही. या विचारात तीने चिठ्ठी लिहुन भावाना व्यक्त करत जीवन संपवले. आतापर्यंत अनेक तरुणांनी आरक्षण नसल्यामुळे व घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Web Title: No Maratha reservation, Maratha girl ends her life
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study