Home अहमदनगर Latest News: शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

Latest News: शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

श्रीरामपूर(जि. अहमदनगर): राहता तालुक्यातील वाकडी येथील गणेशनगर रोड जाधव वस्ती येथील आदिनाथ भास्कर जाधव या शेतकऱ्याचा विहिरीत तोल जाऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे वाकडी परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वाकडी गणेशनगर रोडवर असलेल्या जाधव वस्तीभागात राहणारा अल्पभूधारक शेतमजूर आदिनाथ भास्कर जाधव हा शुक्रवारी दिनांक २४ दुपारनंतर घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी व भावकीतल्या लोकांनी सर्वत्र शोध घेतला. नंतर तो चोळकेवाडी येथे असलेल्या बहिणीकडे गेला की काय याची चौकशी केली असता तिथे नसल्याने व त्याचा मोबाईल बंद असल्याने त्या रात्री आदिनाथचे संपूर्ण कुटुंब रात्रभर चिंताग्रस्त होते. दुसऱ्या दिवशी शोध कार्य सुरु केले असता शनिवारी दिनांक २५ दुपारी ४ वाजेच्या सुमारास चुलत भाऊ अण्णासाहेब जाधव हे मोटारबंद करण्यासाठी गेले असता सदर विहिरीत अण्णासाहेब यांनी पाण्याची पातळी पाहण्यासाठी डोकावले असता त्यांना आदिनाथ यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला त्यांनी तत्काळ सरपंच डॉ. संपतराव शेळके व पोलीस पाटील मच्छिंद्र अभंग यांना घटनेची माहिती दिली. तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर आदिनाथ जाधव यांचा मृतदेह स्थानिकांनी वर काढला.  

Website Title: Latest News Farmer dies after falling into a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here