संतापजनक! अडीच वर्षांच्या चिमुरडीवर चुलत काका कडून अत्याचार
Breaking News | Nashik Crime: एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर नात्याने चुलत काका असलेल्या २१ वर्षीय तरुणाने अत्याचार (abused) केल्याची संतापजनक घटना.
नाशिक : चारोसे, ता. दिंडोरी येथे एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर नात्याने चुलत काका असलेल्या २१ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याबाबत संशयीत आरोपीस पोलिसांनी अटक केली असून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी पोलीस ठाणे हद्दीत चारोसे गावात एका अडीच वर्षांची मुलगी ता. १३ जुन रोजी सायंकाळी ०५:३० वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असताना मुलीचा नात्याने चुलत काका असलेला संशयीत आरोपी रतन भास्कर गांगुर्डे, वय २१ वर्ष, राहणार चारोसे तालुका दिंडोरी याने तिला घरासमोरून घेऊन गेला.
मुलगी बराच वेळ झाले दिसत नाही म्हणून तिचे घरातील व आजू बाजूचे लोकांनी तिचा शोध घेत असताना रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास सदर मुलगी घरापासून काही अंतरावर उसाच्या शेतात संशयीत मुलासह दिसून आली.
संशयीताने अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजले. याबाबत पीडीत मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि जबाब नोंद करून गुन्हा (Crime) दाखल केला.
याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून पोस्को कायदा (POSCO Act) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास वणी पोलीस ठाण्याचे सपोनि. सुनिल पाटील करीत आहे. या घटनेने संताप व्यक्त होत आहे.
Web Title: Two and a half year old girl abused by cousin uncle
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study